Home विदर्भ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रधान करण्याची वेणी गावातील गुरुदेव भक्ताची मागणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रधान करण्याची वेणी गावातील गुरुदेव भक्ताची मागणी

184

प्रतिनिधी:- प्रमोद झिले,येरला हिंगणघाट

स्थानीय वेणी येथे मानवतेचे महान पुजारी वं. राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या 53व्या पुण्यतिथीनिमित्त वेणी येथे सर्व ग्रामवासियांनी कोरोना महामारीचे संकटं टाळून आणि गुरुकुंज आश्रम मोझरी येथे गर्दीचा घोळ न घालता आपल्या च गावावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.तसेच गावातील नागरिकांसमोर राष्ट्रसंताच्या विचाराचे विचार मनतन करून राष्ट्रसंत हे जगाविख्यात संत असून त्यांनी आपल्या भजन आणि कीर्तनच्या सह्ह्याने देशाला स्वतंत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामगिता सारखा बहुमूल्य ग्रंथ ग्राम लोकांना अर्पण केला. गावावरून देशाची परीक्षा, सर्व गाव विश्वाचा नकाशा असे विचार जण माणसात रुजवून गावात गावात ग्राम राज्य निर्माण करण्याचे कामं केले. त्यांच्या कार्याची सरकार ने दखल घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी वेणी येथील श्री गुरुदेव भक्तांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित..मधूकर लोनबळे, प्रदीप पडवे,भारत लोनबळे, रामदास मोहर्ले,नरेश गंगापारी समस्त वेणी ग्रामवासी यांची उपस्थिती होती