Home विदर्भ लक्ष्मणराव ज्ञानेश्वर कठाने यांनी अधिकाऱ्यांच्या आश्वसनाने सोडले उपोषण.

लक्ष्मणराव ज्ञानेश्वर कठाने यांनी अधिकाऱ्यांच्या आश्वसनाने सोडले उपोषण.

175

यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी):-तालुक्यातील रामगाव (रामे)येथील लक्ष्मण ज्ञानेश्वर कठाने (वय अं ७२वर्षे) यांचा दि.२५/१०/२०२१ पासून १) त्रीसदस्यीय उच्च स्तरीय समिती स्थापन करून चौकशी करणेबाबत.२) खोटा व बनावट दारव्हा पोलिस स्टेशन ला दाखल झालेल्या रिपोर्ट वरून सचिव व माजी सरपंच यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत.३)दस्तेवजाचे कागदपत्र अफरातफर केल्यामुळे गुन्हा दाखल करणे बाबत.अशा तीन प्रमुख मागण्या करिता रामगाव(रामे) ग्रामपंचायत कार्यालया समोर बसून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत स्थानिक प्रशासन(पंचायत समिती दारव्हा) व जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन दारव्हा,जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ,सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांना पूर्व सूचना देवून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.सविस्तर वृत्त असे की, दि.१६/४/२०१८ रोजी साचिवाचे विरूद्ध गटविकास अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी दारव्हा यांच्या कार्यालयात माहिती अधिकार दाखल केला होता.त्याबाबत त्यांनी काहीच माहिती पुरविली नाही.उलट माझ्या विरोधात काही कारण नसतांना खोटा व बनावट सचिव व माजी सरपंच यांनी दि.९/७/२०१८ रोजी पोलिस स्टेशन ला रिपोर्ट दिला होता.त्याबाबत पोलिस अधिकारी व तहसीलदार साहेब दारव्हा यांनी सखोल चौकशी केली असता तो बनावट खोटा असल्यामुळे त्या रिपोर्ट मजकुराअन्वये त्यांना कोणतीही कायदेशीर कार्यवाही करता आली नाही.म्हणून सचिव व माजी सरपंच यांनी पोलीस चौकशी अधिकारी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर इस्तेगाशा क्र.१४०/१८कलम १०७,११६(३)काही रिपोर्ट मधील नावे कमी करून दाखल केला होता.मी माझ्या विरोधात दि.९/७/२०१८ रोजी खोटा रिपोर्ट दिला म्हणून मी दि.१०/७/२०१८ रोजी त्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी म्हणून दारव्हा पोलिस स्टेशन मध्ये अर्ज दिला आहे आज पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही.तसेच सरपंच व सचिवाने भ्रष्टाचार केला किंवा नाही याबाबत चौकशी होण्याकरिता गावातील नागरिकांनी व मी सन २०१५ते२०१९पर्यंत त्री सदस्यीय उच्च स्तरीय समिती स्थापन करून सखोल चौकशी ची सर्व स्तरावर निवेदन दाखल करूनही आजपावेतो चौकशी झालीच नाही.तसेच कागदपत्रे अफरातफर करणे हा कायद्याने गुन्हा आहे.एवढेच नव्हे तर त्यांनी गावातील काही लोकांना हाताशी धरून लोकांना भडकावून गावातील शांतता व सुव्यवस्था भंग कशी होईल हा उद्देश ठेवून अनधिकृत जमाव गोळा करून माझ्या विरोधात काही लोकांच्या सह्यानीशी ग्राम पंचायत कार्यालयात अर्ज घेवून ठेवणे त्याबाबत मी नक्कल मागितली असता न देणे,त्यामुळे माझी मानहानी झाली आहे.ज्या लोकांनी माझ्या विरोधात अर्ज दाखल केला त्यांचा व माझ्या ताब्यात असलेल्या जागेचा कुठेही कायदेशीर संबंधच येत नाही.म्हणून मी दि.२५/१०/२०२१ ला सदर रामगाव (रामे)येथील ग्राम पंचायत कार्यालया समोर माझ्या तीन मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे.असे प्रशासनाला लक्ष्मण ज्ञानेश्वर कठाणे यांनी सुचनापत्राव्दारे कळविले होते. त्यामुळे मा. राजीव शिंदे साहेब गटविकास अधिकारी पं.स.दारव्हा यांनी अन्यायग्रस्त लक्ष्मण ज्ञानेश्वर कठाने यांना उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पत्र पाठवून फोन द्वारे उपोषण सोडण्यास सांगितले.तर पोलीस स्टेशन दारव्हा चे ठाणेदार सुरेश मस्के साहेब यांनी पी. एस. आय.दोडके साहेब,जमादार दाढे साहेब व इतर कर्मचारी यांना पाठवून दखल घेतली.तसेच पी. एस. आय. दोडके साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून गुन्हेगारांना शासन करण्याचे आश्वासन देवून तूर्तास उपोषण सोडविले.तर बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी गट विकास अधिकारी यांच्याशी व ठाणेदार साहेब यांच्याशी वार्तालाप करून त्र्याहत्तर वर्षीय लक्ष्मणराव ज्ञानेश्वरराव कठाने यांचे उपोषण सोडविण्याचे प्रयत्न केले त्यावेळी गोलू गायकवाड,प्रशांत ठाणे सिद्धांत बोरकर तसेच रामगाव (रामे) येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.