Home औरंगाबाद अखेर प्राध्यापक डॉ , राजेंद्र शिंदे यांच्या खुनाचा गूढ उकललं ,

अखेर प्राध्यापक डॉ , राजेंद्र शिंदे यांच्या खुनाचा गूढ उकललं ,

338

 

 

अमीन शाह ,

औरंगाबाद : -आज सोमवार 18 ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी माहिती दिली की काही दिवसांपूर्वी मौलाना आजाद महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्र शिंदे यांचा राहत्या घरात खून झाला होता , सदर प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ . निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून तपास करण्यात येत होता , सदर प्रकरणाचा तपास करून या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिस आयुक्त गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे , सदर प्रकरणात एका अल्पवयीन विधि संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले असून , त्याने खून केल्याची कबुली आज रोजी दिली आहे , सदरील अल्पवयीन विधी संघर्ष बालकाला बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून , वडिलांनी रागवण्याचा कारणावरून आणि वेब सिरीज पाहून खून केल्याचा अंदाज बांधण्यात आला होता , मात्र अभ्यासावरून वडील रागावल्याने दोघांमध्ये वाद होत होते , सदरील विधी संघर्ष बालकाने राजन शिंदे झोपल्यावर सदरील खून करून खुनासाठी वापरलेले हत्यार विहिरीत टाकण्यात आले होते , सदरील हत्यार पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून , सदर प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त डॉ . निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , सायबर क्राईम , आणि विशेष पथकाने केल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे ,

 

 

पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद ,