Home वाशिम साप पकडणारा मंगरुळपीरचा अवलीया……

साप पकडणारा मंगरुळपीरचा अवलीया……

402

आतापर्यत पंधरा हजारापेक्षाही सापांना जिवदान देवून अधिवासात सोडणारा सच्चा सर्पमिञ

समाजकारण व पर्यावरण अबाधित ठेवणारा ध्येयवेडा गौरवकुमार

फुलचंद भगत
वाशिम:-ऊच्चशिक्षित असुन पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी सतत झटणारा आणी राजकारणातुन समाजकारण जोपासणारा मंगरूळपीरच्या गौरवकुमार इंगळे यांनी गेल्या बारा वर्षापासुन पंधरा हजारांच्या वर सापांना जिवदान देवून अधिवासात सोडणार्‍या या अवलियाला प्रशासनानेही मानद वन्यजीव रक्षक जिल्हा वाशिम वन विभाग महाराष्टराज्य यांनी पदाची धुरा दिली.
मंगरुळपीरला मुळ रहिवाशी असणार्‍या आणी इलेक्र्टीकल इंजिनिअरिंगचे ऊच्च शिक्षण घेतलेल्या ध्येयवेड्या गौरवकुमार इंगळे या तरुणाला बालपणापासुनच समाजकारण आणी शिक्षणाची ओढ लागली.वडील अरुण इंगळे यांनी प्राचार्यपदाची धुरा सांभाळली तसेच अमरावती विभाग अभ्यासमंडळावर सदस्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली त्यामुळे बालवयापासुनच गौरवकुमारला शिक्षण आणी जनसेवेची ओढ लागली.सन २००९ पासुन महाविद्यालयीन जीवनात असल्यापासुन सर्पमिञ म्हणून काम केले.पुढे हा छंद जोपासत मोठी टीमही ऊभी करत त्यांनी युवकांनाही साप पकडन्याचे आणी सापाविषयी समजगैरसमज याविषयी वेळोवेळी मार्गदर्शनही केले.सन २०१७ रश्मी यांचेशी विवाह केला त्या स्वतः साहित्यिक आणी कवयीञी आहेत.राञीबेराञी साप निघाल्याचा फोन येतो आणी क्षणाचाही विलंब न लावता गौरवकुमार हे सापांना मोठ्या शिताफीने पकडून त्या सापांना अधिवासात सोडतात.पत्नी आईवडीलही त्यांच्या या छंदाला व समाजसेवेला नेहमी प्रोत्साहनच देतात त्यामुळे अजुन ऊत्साहाने मी लोकहिताचे काम करतो असे गौरवकुमार इंगळे हे नेहमीच अभिमानाने सांगतात.प्रत्येक युवकांनी त्यांना असलेल्या आवडीप्रमाणे ग्राऊंडलेवलवर काम करुन आपली प्रतिभा दाखवणे गरजेचे आहे व सोशल वर्क फक्त सोशल मिडियावरच सिमित न ठेवता ते लोकांच्या हितासाठी तळागाळात जावुन काम करण्याचा पुढाकार घ्यावा असेही ते युवकांना सांगतात.मला राजकारण,समाजकारण आणी पर्यावरणासाठी सदैव काम करण्याचा ऊत्साह असतो त्यामुळे न थकता,न डगमगता मी अविरत हा वसा तेवत ठेवणार असल्याल्याच्याही इंगळे यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206