Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे पालकमंत्री ना , डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ओपन जिमचे...

साखरखेर्डा येथे पालकमंत्री ना , डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ओपन जिमचे लोकार्पण

515

 

 

अमीन शाह ,

बुलडाणा :

    वार्षिक योजना सन २०२०-२१ या वर्षात व्यायामशाळा विकास अनुदान योजने अंतर्गत ग्रामपंचायत साखरखेर्डा ता.सिंदखेड राजा येथे ओपन जिम तथा व्यायाम साहित्य मंजुर आहे. या ओपन जिमचे लोकार्पण आज दिनांक १० ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे मंत्री यांच्या हस्ते ओपन जिम व व्यायाम साहीत्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे अँड .नाझेर काझी, जी , प , सदस्य रामभाऊ जाधव, जि. प. सदस्य दिनकर बापु देशमुख, कर्तवयदक्ष सरपंच दाऊद सेठ कुरेशी ग्रा , प , सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी साखरखेर्डा येथील तालुका क्रीडा संकुलचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठविण्यासाठी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी सूचना दिल्या. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी याप्रसंगी युवकांनी या जिमचा लाभ घ्यावा, देशाकरीता सैन्यात भरती व्हावे, व्यसनापासुन दुर व्हावे, क्रीडा विभागाला या निमित्ताने जी-जी मदत हवी असेल ती-ती मदत देण्यात येईल. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी व संचलन क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार तर अनिल इंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी गावातील क्रीडाप्रेमी नागरीक, व्यायामपटू व शिक्षक मंडळी उपस्थित होते, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.