Home मराठवाडा शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाने तातडीने मदत करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा: माजी...

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाने तातडीने मदत करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा: माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत

497

जालना _लक्ष्मण बिलोरे

सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहात माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करून मेहकर तालुका तसेच परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अशी माहिती स्थानिक रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मा सदाभाऊ खोत यांना कळवली असता त्यांनी ‘आमचं रक्त आणि नातं फक्त शेतकरी आणि शेतकरीच आमचा मायबाप’ म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना करता येईल ती मदत करा असे आवाहन केले होते. तो अहवाल प्राप्त होतात आमदार सदाभाऊ खोत यांनी मेहकर दौऱ्याचे आयोजन केले .त्यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर जसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ,पक्षबांधणी ,येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटनेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्याच्या सूचना आमदार खोत यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नगरपालिका निवडणूक मोर्चेबांधणी साठी रयत क्रांती संघटनेचे जितूभाऊ अडेलकर जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ॲड संदीप गवई यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले. त्यानंतर शेतकरी युवा नेते राणा चंदन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राज्य प्रवक्ता जितूभाऊ अडेलकर, जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे , जिल्हा सल्लागार ॲड. संदीप वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप गवई, तालुका अध्यक्ष महेश काळे यांच्या प्रयत्नाने असंख्य युवा तसेच शेतकरी. आकाश वसवकर , आशिष मोरे, महेश सुर्वे, विशाल माने, ओम आघाडे, सिद्धू कंकाळ, सोनू कांबळे, अतुल गवई, विवेक कळंबे, आशिष पवार, तुषार सानप, महेश मोरे, अक्षय पवार, सचिन गवई, अक्षय सोनुने, सौरभ अडेलकर, साहिल गवई, प्रदीप गवई, लखन दुतोंडे, आकाश कांबळे, शुभम वाघमारे, पवन डोंगरे, अजय पवार, रवि राठोड, कृष्णा खोडके, अनिकेत देबाजे, आकाश झनक, भूषण पनाड, नवले, रोहन बोरकर, तुषार सानप, दर्शन महाले, अनिकेत काळे, सिद्धू कंकाळ, रमेश मानवतकर, अभिजीत देशमुख, दिपक घुगे, अजिंक्य लमड, नागेश मोरे, ऋतिक तुरुकमाने,
कार्यकर्त्यांनी माननीय सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रयत क्रांती संघटनेत जाहीर प्रवेश केला .यावेळी असंख्य कार्यकर्ते ,शेतकरी तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती.