
समीर शेख ,
चिखली : बहुजनांची प्रेरणा असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगृहातील आंबेडकरी विचारधारेचे शिलेदार आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा नेते विजयकांत गवई यांनी दि. १ आक्टोंबर २०२१ रोजी तारा विश्राम गृह, चिखली येथे बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजयदादा वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वीकारली.
यावेळी बोलताना लोकनेते विजयदादा वाकोडे म्हणाले की, संघटना वाढण्यास सुरुवात करून बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वलयाखाली आला पाहीजे. आगामी निवडणूकांबाबत सुतोवाच करून तयारीला लागा असेही सांगितले. प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांनी पक्ष व संघटनेचे ध्येय उद्देश विषद केले तर विदर्भाध्यक्ष योगेंद्र चवरे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकून संघटना वाढण्यास मदत करू असे आश्वासन दिले. आशिषभैया वाकोडे यांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कसे असावेत या संबंधित मौलिक मार्गदर्शन केले. या वेळी विजयकांत गवई यांना जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा करण्यात आली. सदर पदाला आपण न्याय देऊ आणि टाकलेली जबाबदारी पुर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहू असे आश्वासन विजयकांत गवई यांनी दिले.
यावेळी उपस्थितांमध्ये युवा नेते आशिष वाकोडे,अनिल गवई अकोला, महेंद्र गाडेकर, खमर फुलारी, प्रविण गायकवाड या मान्यवरांच्या समवेत युवा नेते विजयकांत गवई समर्थक शेख सलिम भाई,बह्मभाऊ साळवे, पेंटर सुरेश इंगळे , सुनिल सोळंके,शेख वसिम, संतोष सोळंके सतिष पवार,सतिष इंगळे, सिध्दु मघाडे,हरसिंग छैरे,संजय वाघ,पवन साळवे,गोपाल जाधव, सागर इंगळे,शेख दानिश, याच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन सत्य कुटे तर आभार प्रदर्शन सुनिल सोळंके यांनी मानले.











































