Home बुलडाणा वीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ,

वीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ,

372

 

 

हनिफ शेख , 

अंढेरा. प्रतिनिधी…3ऑक्टोबर

भागवत केशव साखरे या वीस वर्षाच्या तरुणाने आपल्या राहत्या घरातील छताला दोरी बांधून 2ऑक्टोंबर रोज शनिवार ला सायंकाळी 8 वाजता गळफास लावुन मृत्यूला कवटाळले ही घटना देऊळगाव घुबे येथे घडली.
सदर तरुण हा दिवसभर आई-वडीलांसोबत सोबत शेतात सोयाबीन सोंगन्याचे काम करून संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील सर्वजण काकाच्या घरी जेवणासाठी गेले होते व भागवत साखरे हा देखील तीथेच होता व घरातील मंडळी जेवायला बसलेले असताना त्याने आपल्या इतर मित्रांना सांगून मी घरून जाऊन येतो असे सांगितले व घरीकोणीच नसल्याचे पाहून स्वतःहा गळफास लावून मृत्यूला कवटाळले ही माहिती कळताच त्याचे काका विजय साखरे यांनी तात्काळ अंढेरा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली.फिर्याद दाखल होताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हीवरकर यांनी तात्काळ आपला पोलिस ताफा घटनास्थळी पाठवून मर्ग क्रमांक 29/ 2021 कलम 174 सीआरपीसी दाखल करून. पुढील तपास अधिकारी म्हणून पोलिस काॅन्सटेबल गजानन भानुसे व कैलास उगले काम पाहतआहेत.