Home वाशिम वन्यजीव सप्ताहानीमित्य वनपरिक्षेञातील कर्मचार्‍यांनी केले श्रमदान

वन्यजीव सप्ताहानीमित्य वनपरिक्षेञातील कर्मचार्‍यांनी केले श्रमदान

73

फुलचंद भगत

वाशिम:-वन्यजीव सप्ताहानिमित्य वनपरिक्षेञातील सर्व वनकर्मचार्‍यांनी श्रमदान करुन दोन अनगड दगडी बांध तयार केले आहे. दि.०१ ऑक्टोंबर, २०२१ ते दि.०७ ऑक्टोंबर,२०२१ पर्यंत वन्यजीव सप्ताह निमित्त वाशिम वनविभागाअंतर्गत वाशिम वनपरिक्षेत्रामधील वाशिम वर्तुळातील अनसिंग नियतक्षेत्रामध्ये कक्ष क्र. १५५ मध्ये मा. श्री. सुमंत सोलंके, भा.व.से, उपवनसंरक्षक (प्रा.) वाशिम वनविभाग- वाशिम, मा. श्री. विपूल राठोड, म.व.से, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) व श्री. छत्रपती चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) वाशिम आणि वाशिम वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी या सर्वांचे सहभागातून श्रमदान करून ०२ अनगड दगडी बांध तयार केले.

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206