Home वाशिम वाशिम पोलिसांनी दोन मोटरसायकल चोर केले जेरबंद……

वाशिम पोलिसांनी दोन मोटरसायकल चोर केले जेरबंद……

512

 

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही;दोन मोटरसायकल चोरास अटक

४,३०,०००/-रुपयाची १४ मोटारसायकली हस्तगत

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम पोलिस दलामध्ये कर्तव्यदक्षतेच्या ऊच्चांकीमध्ये संपुर्ण महाराष्टामध्ये नावलौकीक असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या शिलेदारांनी पुन्हा एकदा आपले कौशल्य सिध्द केले असुन मोटारसायकर चोरट्यास शिताफीने छडा लावुन जेरबंद केले आहे.
वाशिम जिल्हा हा मुळात शांतताप्रिय लोकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.इथे सर्वधर्मिय मोठ्या गुण्यागोविंदाने राहुन वास्तव्य करतात.असे असतांना काही विघ्नसंतोषी जिल्ह्याची शांतता सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात पण स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने किचकट गुन्ह्याचाही मोठ्या शिताफिने छडा लावुन तसेच काही गुन्ह्यात पुरावे शिल्लक नसतांनाही योग्य तपास करुन गुन्हेगारांना जेरबं केले.वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या शिलेदारांच्या नेहमी ‘अलर्ट’ कर्तव्यतत्परतेच्या शैलीने वाशिम जिल्हा मोकळा श्वास घेतो असे सुज्ञ नागरीक नेहमीच बोलतात.शांतता सुव्यवस्था तसेच गुन्हेगारांचा छडा लावून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेची वाखाणन्याजोगी आजवरची कामगीरी बघता विद्यमान वाशिम पोलिस अधिक्षकांनीही त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सत्कारमय ऊपक्रम राबवावा अशी जनमाणसात मागणीही होत आहे.अशाच एका गुन्ह्याचा तपास करुन आरोपिंना जेरबंद केले.सविस्तर असे की,दिनांक २०/०९/२०२१ रोजी फिर्यादी भुषन अजबराव राउत वय ३० वर्ष रा. वनोजा ता. मंगरूळपीर
जि. वाशिम यांनी पोस्टे मंगरूळपीर येथे तक्रार नोंदविली की, यातील फी. यांची पॅशन प्रो मो.सा. क MH-
37/F-8628 ही त्यांचे घरासमोर दि.१५/०९/२१ ते दि.१६/०९/२१ चे २२.३० वा चे सुमारास उभी केलेली
असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने वरील मो सा. कि.२५,००० रू ची चोरून नेली अशा रिपोर्ट वरून पोलीस
स्टेशन मंगरूळपीर येथे अप.क.९६०/२१ कलम ३७९ भादविचा दाखल करण्यात आला.मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेश देवुन रवाना केले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) विजय अशोक बनसोड वय २५ रा काटा, ता. जि. वाशिम २) विधीसंघर्ष बालक रा काटा, ता. जि. वाशिम यांना मोटरसायकल गुन्हयाचे संदर्भात सखोल विचारपुस केली असता पॅशन प्रो मो.सा. क MH-37/F-8628 कि २५,०००/- रू ची मोसा तसेच हिंगोली, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळया कंपनीच्या १३ मो. सा. किं. ४,०५,०००/- रू च्या चोरल्याचे कबुल केले व सदर मो.सा. त्यांचे कडुन हस्तगत करून पुढील तपास कामी नमुद आरोपी व मोटारयसायकल पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांच्या ताब्यात दिली.सदर कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,सपोनि अतुल मोहनकर,प्रमोद इंगळे,विजय जाधव, पोउपनि पठाण,पोना सुनिल पवार,राजेश राठोड,प्रशांत राजगुरू ,अमोल इंगोले, पोशि राजेश गिरी, अश्वीन जाधव,दिगंबर मोरे,
संतोष शेणकुडे,चालक मिलिंद व संदीप यांनी सहभाग नोंदविला. नमुद गुन्हयाचा पुढील तपसि पोलीस स्टेशन
मंगरुळपीर हे करीत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206