Home मराठवाडा 80 टक्के साप विषारी नसतात- डॉ. रोहित कासट

80 टक्के साप विषारी नसतात- डॉ. रोहित कासट

219

जालना: एसआरपीएफमध्ये सर्पदंश प्रथमोपचारावर कार्यशाळा

जालना- लक्ष्मण बिलोरे

– सुमारे 80 टक्के साप विषारी नसतात. सर्पदंशानंतर माणूस मात्र कमालीचा भेदरून जातो. तो विषारी नसलातरी काहीजण नुसत्या भीतीनेच मृत्युमुखी पडतात. ही बाब विचारात घेऊन सर्पदंशानंतर मांत्रिकाकडे जाण्याऐवजी डॉक्टरांकडे जाऊन प्रथम उपचार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विवेकानंद हॉस्पिटलचे डॉ. रोहित कासट यांनी येथे केले.

     येथील राज्य राखिव पोलीस बल गट क्रमांक 3 मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जालना लायन्स क्लबच्यावतीने सर्पदंशानंतर प्रथमोपचार व जनजागृतीपर शिबिर घेण्यात आले, त्यावेळी डॉ. कासट बोलत होते. व्यासपीठावर एसआरपीएफचे कमांडंट आयएस रागसुधा, असिस्टंट कमांडंट डॉ. शाह, श्री. पैठणे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष लॉ. मिनाक्षी दाड, लॉ. विजयकुमार दाड यांची उपस्थिती होती.

    यावेळी डॉ. कासट यांनी सर्पदंशानंतर कोणते उपचार घ्यावेत, दंश झालेल्या ठिकाणी दाताच्या खुणावरून तो कोणत्या जातीचा आहे, किती विषारी आहे, हे समजून घ्यावे, विनाकारण घाबरुन न जाता सर्पदंशानंतर  24 ते 48 तासाच्या आत दवाखाना गाठून उपचार घेतल्यास धोका टाळता येऊ शकतो. सापांच्या अनेक जाती आहेत, फक्त 20 टक्केच साप विषारी असतात. 80 टक्के साप विषारी नसतात. कोणताही साप चावल्यास व्यक्ती कमालीचा भेदरतो. घरातील सदस्यही घाबरून जातात.  अशावेळी मांत्रिकाचा शोध घेण्यात अथवा गावठी उपचार करण्यात वेळ घातला जातो, हे चुकीचे आहे. साप विषारी असेल तर त्याच्या दंशामुळे कोणताही धोका नसतो, असे सांगून, त्याच्या मनातील भीती घालविण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन खातरजमा करावी, असा सल्ला देऊन कोणते प्रथमोपचार करावेत, साप विषारी आहे की नाही, हे कसे ओळखावे, हे डॉ. कासट यांनी चित्रफितीच्या माध्यमातून तसेच विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. यावेळी त्यांनी विविध जातीच्या सापाची माहिती दिली.

    एसआरपीएफचे अधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची डॉ. कासट यांनी उत्तरे देऊन शंका-समाधान केले.