
मंगरूळपीर पोलिसांनी गांजातस्कराला ठोकल्या बेड्या ,
फुलचंद भगत
वाशीम:-जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलिसांनी दि. २९ बुधवार रात्री मंगळसा फाटा येथे साठ हजार रुपयांच्या गांजासह एका आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पीएसआय संतोष आघाव यांनी तक्रार दिली की, डि बी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ता. २९ चे रात्री तालुक्यातील मंगळसा फाटा येथे पंचासह सापळा रचण्यात येऊन आरोपी सुरज गोपाल गुप्ता वय २०, रा. बालाजी मंदिरा जवळ वाशीम याचेकडुन कापडी बॅगमध्ये कागदामध्ये नायलॉन पट्टीने बांधलेल्या व प्लास्टिक पिशवी लावलेले तीन पॉकेट ज्यामध्ये ६ किलो १९८ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सदर गांजा जप्त करून आरोपीस अटक केली.तसेच त्याचेवर एन डी पी एस कायदा १९८५ कलम २०,२२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अतिरिक्त जिपोअ गोरख भामरे, एसडीपीओ यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार धनंजय जगदाळे, पीएसआय संतोष आघाव,ना.पो.कॉ अमोल मुंदे, पो.कॉ. मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, सुनील गंडाईत, सुमीत चव्हाण, मिलिंद भगत, जितेंद्र ठाकरे वाहन चालक राठोड, श्याम गीते यांनी केली.
- प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206











































