
मुख्याधिकारी मडावी यांना मनसेचे निवेदन….
मनसेने दिला ८ दिवसाचा अल्टिमेटम….
यवतमाळ शहरातील रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांच्या विषयावर तसेच शहरातील वाढती रोगराई त्या अनुषंगाने शहरातील दाट वस्त्या झोपडपट्टी भागात तात्काळ औषध फवारणी करावी आणि शहरातील मोकाट कुत्रे गुरेढोरे यांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार व मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात आज नगर पालिकेच्या मुख्याधिकारी मडावी यांना निवेदन देण्यात आले .
यवमाळमधील नवरात्रोत्सव देशात नावाजलेला आहे.अश्या काळात संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले आहेत.खड्यामुळे संपूर्ण यवतमाळकर नागरिक त्रस्त आहेत.यामुळे अनेकांना मणक्यांचे आजार, अपघात होत आहेत एवढ्या गंभीर विषयावर कोणीच बोलायला तयार नाहीत तसेच अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत तसेच सकाळी फिरणाऱ्या नागरिकांना पण कुत्र्यांनी डस्ल्याच्या तक्रारी आल्या आहेत वाहतुकीला मोकाट जनावरांचा खूप त्रास होत आहे.सोबतच शहरात डेंग्यू मलेरिया टायफाईड यासारख्या रोगांनी थैमान घातले आहे तरी सुध्धा नगर पालिकेच्या वतीने कुठेही फवारणी अथवा दाट वस्त्यांमध्ये साफसफाई केल्या गेली नाहीं.सर्व अधिकारी कर्मचारी ठेकेदार आपले कागदोपत्री बिल काढण्यात मस्तगुल आहे.या सर्व विषयात सर्व सामान्य यवतमाळकर जनता भरडली जात आहे.या सर्व गंभीर विषयांवर नगरपालिका प्रशासन ढिम्म असून येत्या आठ दिवसात रस्त्यांची कामे फवारणी व गुरांचा बंदोबस्त न झाल्यास मनसेच्या वतीने नगरपालिका विरोधात आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापूरे यांनी या प्रसंगी दिला.










































