
प्रतिनिधी -: धनराज खर्चान
अमरावती / भातकुली -: तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पाचे भूमिपूजन १० एप्रिल २००८ रोजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले , प्रशासकीय मंजुरी मिळाली तेव्हा या प्रकल्पाची एकूण किंमत १६१ कोटी इतकी होती,

त्या प्रकल्प मध्ये एकूण २५३२ हेक्टर इतकी जमीन संपादित करण्यात आली ,या प्रकल्पामध्ये पाच गाव पूर्णतः बुडीत क्षेत्रात व दोन गाव अंशतः बुडीत क्षेत्रात येतात , महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कायद्याने करण्यात आले या कायद्यामध्ये एकूण १८ नागरी सुविधा आहे ज्या पाच गावाचे पुनर्वसन झाले त्यापैकी एक गाव म्हणजे अळण गांव या गावचे पुनर्वसन मौजा कठोरा ( बु )अमरावती येथे करण्यात आले.या पुर्नवसन गावाकडे पुनर्वसन विभागाचे अक्षरशःदुर्लक्ष व कामात दिरंगाई होताना दिसत येत आहे . ज्या१८ नागरी सुविधा आहे त्यापैकी ज्या सुविधा तेथे झालेल्या आहेत.त्या अतिशय निकृष्ट व दुय्यम दर्जाच्या झालेली दिसत आहे , ज्यामध्ये नाल्याचे बांधकाम त्या नाल्याची रुंदी उंची व उतार व्यवस्थित काढलेला नाही त्यामुळे नालीमध्ये पाणी साचते त्या साचलेल्या पाण्यावर मच्छर होत आहे व त्यामुळे येथे राहत असलेल्या नागरिकांना साथीच्या रोगाशी दोन दोन हात करावे लागत आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, विजेचे खांब वाकलेले व विजेची तार लुंबकलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही , शाळेच्या इमारतीचे काम झालेले आहे शाळेच्या भिंतींना तळे गेलेले आहेत इत्यादी कामे झाले आहेत ती पण अशीच, अळणगांव येथे पण विकास कामे बंद आहेत कारण ते गांव बुडीत क्षेत्रात येते म्हणून आणि मौजा कठोरा पुनर्वसन अळणगांव येथे अतिशय निकृष्ठ दर्जाचे कामे होत आहे हे तर असं झालंय ना घर का ना घाट का अशी अवस्था या गावातील नागरिकांची झालेली आहे










































