Home सातारा आईच्या पुण्यतिथी निमित्त मायणीच्या डॉ मकरंद तोरो यांचा अनोखा उपक्रम….

आईच्या पुण्यतिथी निमित्त मायणीच्या डॉ मकरंद तोरो यांचा अनोखा उपक्रम….

558

मायणी,या.खटाव जि.सातारा

ज्या घरात आई नाही त्या घराला घरपण नाही असे म्हणतात ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या म्हणीप्रमाणे आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त मायणीच्या मकरंद तोरो या डॉक्टरांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी रुग्णांवर मोफत उपचार करुन आपल्या आईला वेगळ्या प्रकारे आदरांजली वाहिली त्या दिवशी येणाऱ्या सर्व म्हणजे जवळ जवळ ९० ते १०० पेशंटना सर्व सेवा मोफत देऊन एक अनोखा उपक्रम केल्याची चर्चा परिसरात आहे.
गेली दीड दोन वर्षे कोरोनाने सगळ्या जगात थैमान घातले यावेळी बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला सरकारी यंत्रणा पण थोडी हतबल झाली पण त्यातून सरकारने थोडगा काढून उपाय योजना करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि सध्या कोरोनाचा काळ ओसरू लागला असून नियमित पेशंट वाढत आहेत.त्यातच अवेळी येणारा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे वायरल ताप थंडीच्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. मायणी ही मुख्य बाजार पेठ असल्यामुळे आरोग्य सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध होतात त्यामुळे मायणी व परीसरातून मोठया प्रमाणात रुग्ण मायणी या ठिकाणी येत असतात. मायणीतील प्रसिद्ध डॉ कै.रामचंद्र तोरो यांचे अनेक वर्षे आशीर्वाद नावाचे हॉस्पिटल आहे .गेली अनेक वर्षे हे हॉस्पिटल सुरू असून अनेक गरीब रुग्णावर मोफत उपचार केले आहेत.
त्यांचा हाच वारसा डॉ मकरंद तोरो पुढे चालवीत आहेत .कुटल्यानं कुठल्या कारणाने लोकांना मोफत उपचार मिळावे म्हणून आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त या दिवशी येणाऱ्या सर्व रुग्णावर त्यांनी पूर्णपणे मोफत उपचार करून या निमित्ताने एक नवा आदर्श घालून दिला आहे.