Home विदर्भ वलगाव पोलीस ठाण्यात आरोपीची आत्महत्या

वलगाव पोलीस ठाण्यात आरोपीची आत्महत्या

378

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

भातकुली -: अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या वलगाव पोलीस ठाण्यात एका ५७ वर्षीय आरोपीने गळफास लावून आत्महत्याने केल्याने खळबळ उडाली आहे, अरुण बाबाराव जवंजाळ वय ५७ राहणार आष्टी असे मृतक आरोपींचे नाव आहे,एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात त्याला वलगाव पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले होते,त्यामुळे वलगाव पोलीस ठाण्या बाहेर पोलीसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तर महिन्याभरा पूर्वी राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत एका२३वर्षीय आरोपींनी आत्महत्या केली होती तर आज ही दुसरी घटना घडल्याने पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे