Home विदर्भ उपोषण कर्त्यास मारहाण , परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे , “दाखल जातीवाचक गुन्हा दाखल”

उपोषण कर्त्यास मारहाण , परस्परविरुद्ध विरुद्ध गुन्हे , “दाखल जातीवाचक गुन्हा दाखल”

125

कारंजा / कामरगाव , दि. २४ :- येथे जिल्हा परिषद विद्यालय समोर केवळ हाकेच्या अंतरावर देशी दारूचे विक्रीचे दुकान असून ते बंद व्हावे या मागणीसाठी विनोद नंदागवळी याने दुकान कायदेशीर रित्या बंद करण्यासाठी तक्रार केल्याने देशी दारू चालकाने तक्रार कर्त्यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद नंदागवळी यांनी तक्रार केल्याने देशी दारू दुकानात चालकावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की कामरगाव येथे जिल्हा परिषदेची परिसरातील सर्वात मोठी शाळा आहे .या शाळेत किमान सोळाशे विद्यार्थी शिक्षण घेण्याकरता करता येतात या शाळेच्या फाटका समोर काही अंतरावर कट्यारमल यांचे देशी दारूचे दुकान आहे इतक्या कमी अंतरावर दारूचे दुकान कसे ?असा प्रश्न येथील पालक वर्गात नेहमी खटकत होता. याबाबत काही तक्रारी सुद्धा या आधी झालेल्या आहे परंतु त्यावर कारवाई झाली नाही परंतु सदर दुकानामुळे मद्यपींचा येथील विद्यार्थ्यांना त्रास होत होता.त्यामुळे सदर दुकान गावाबाहेर इतरत्र हलविण्यात यावे यासाठी दारू बंदी अधिकारी व संबंधित अधिकारी यांना विनोद नंदागवळी यांनी तक्रारी दिल्या परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने विनोद नंदागवळी यांनी 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा अर्ज दिला. तक्रारीवरून दारूबंदी कार्यालय वाशिम चे कर्मचारी शाळेपासून ते दारूचे दुकान चे अंतर मोजण्यासाठी21जानेवारी ला कामरगाव येथे आले व तक्रार कर्त्या बोलावून घेतले मोजमाप चालू असताना दारूबंदी कर्मचाऱ्या समक्ष देशी दारू दुकान चालक राजू देवरे याने विनोद नंदागवळी यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दारूबंदी कर्मचारी यांनी तेथुन पलायन केले .

सदर घटनेची फिर्याद नंदागवळीने पोलीस चौकी कामरगाव येथे दिली त्यावरून राजू देवरे यांच्या विरुद्ध भादवि कलम३२३, ५०४,५०६,व ३(१) आर एस अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
तसेच यातील आरोपी राजू देवरे यांनी सुद्धा विनोद नंदागवळी चे विरोधात खंडणी मागीतल्याची फिर्याद दिल्याने नंदागवळी यांच्यावर कलम २९४,३८४,३८५,५०६, भादवि गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कारंजा संजय पाटील करीत आहे.