Home रायगड रायगड जिल्हयासाठी 247 कोटीचा आराखडा

रायगड जिल्हयासाठी 247 कोटीचा आराखडा

133

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

रायगड , दि. २४ :- जिल्हा नियोजन समितीने सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी (सर्वसाधारण) 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी. 24.94 कोटी अशा एकूण 247 कोटी 56 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण आणि विकास कामांचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आराखड्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात पुढील वर्षी महत्वपूर्ण योजना म्हणून जिल्ह्यातील सर्व स्मशानभूमी बांधकामासाठी प्राधान्य दिले जाईल. नाविन्यपूर्ण योजनांतर्गत पुढीलवर्षी रुग्णांसाठी स्पीडबोट तयार करण्याची तरतूद मंजूर करण्यात आली. इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थीनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेतील उपस्थिती वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुलींना सायकल पुरविणे हा प्रकल्प हाती घेण्याचे निश्चित झाले. यामध्ये शाळा ते घर हे अंतर 5 कि.मी. पेक्षा जास्त असल्यास अशा मुलींना प्राधान्याने सायकल देण्यात येणार आहेत. नागरी सुविधा अंतर्गत 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये 20 कि.मी. परिसरातील गावांचाही कचरा उचलून निचरा करण्याची योजना आहे. तालुका स्तरीय क्रीडा संकुल अद्ययावत करण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे. अंगणवाडी दुरुस्तीसाठी शासन निर्णयानुसार 1 लक्ष मर्यादा आहे. सदर मर्यादा वाढविण्यासाठी शासन स्तरावर शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर आहे.