
सौंदर्य क्षेत्रातून सर्वत्र कौतुक…

यवतमाळ येथील आर्या हेअर अँड मेकअप अकॅडमीच्या संचालिका सौ गीता राखडे यांना नुकताच मुंबई येथील अनुराग मेकअप मंत्रा इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेकअप अँड हेअर ॲकॅडमी चा ॲडव्हान्स मेकअप चा कोर्स मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करत प्रथम क्रमांक त्यांनी पटकविला आहे . नुकताच मुंबई येथे बॉलिवूड सिने तारिका महिमा चौधरी यांच्या हस्ते त्यांना हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ठिकाणी संपूर्ण देशभरातून शेकडो लोकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.यवतमाळ जिल्ह्यातील या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या आणि प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या त्या एकमेव असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्या अकॅडमीच्या माध्यमातून त्या सर्व परिचित आहेत . समाजातील गोरगरीब विद्यार्थिनींना स्वावलंबी बनविण्यासाठी मेकअप व हेअर स्टाईल चे विशेष सेमिनारचे आयोजन त्या नेहमी करत असतात . सोबतच आर्या अकॅडमीच्या माध्यमातून विविध कोर्सेस त्यांच्या अकॅडमीत शिकवले जातात. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून त्यांना या यशाबद्दल विरभद्र पाटील, महेश पाटील ,सुजाता ब्युटी पार्लर चे संचालक श्री सुनील गेहलोत , श्री सागर टाटाजी ,ग्रॅफिओ सलोन सौ आरती मोरे, उर्वशी ब्युटी पार्लर, सौ स्मिता बोबडे ,नखरा ब्युटी पार्लर इत्यादी त्यांचे कौतुक केले आहे.










































