Home मराठवाडा शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पालकमंत्री यांना फिरू देणार नाही –  निसार पटेल

शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पालकमंत्री यांना फिरू देणार नाही –  निसार पटेल

183

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार ईम्तीयाज ज़लील साहेब तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफार कादरी व जालना जिल्हा अध्यक्ष शेख माजेद भैयाजी यांच्या नेतृत्वाखालील घनसावंगी येथे ओला दुष्काळ जाहीर करावा,या मागणी साठी एमआयएमचे जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार घनसावंगी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,मागील आठवड्यात घनसावंगी मतदारसंघात संततधार व अती मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खरीप पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.तसेच जनवारे पुरात वाहुन गेल्याने व घरांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागाला हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर करावी.पिक विमा कंपन्याना बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम तात्काळ जमा करावी.असे आदेश शासनाने संबंधित कंपन्याना देण्यात यावेत.तसेच घरांची पडझड झालेल्या व जनवारे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पन मदत जाहीर करण्यात यावी.

पंचनामे न करता तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना घनसावंगी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.१५ दिवसात मदत जाहीर न केल्यास घनसावंगी येथे आंदोलन करण्यात येईल.पालकमंञी यांना मतदारसंघात एमआयएम पक्ष फिरु देनार नाही.

यावेळी जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल,शेख निजाम तालुका उपाध्यक्ष ईमरान पठाण,शहर अध्यक्ष गुरफाण फारुकी,नशीर पठाण,रियाज शेख,मुबारक पठाण,भास्कर पाटोळे,शेख हसण,शमशु पठाण,सय्यद शरीफ.शेख निसार,हरीश मौलाना,उसमान पटेल इतर पदाधिकारी उपस्थित होते.