Home विदर्भ पार्किंगचे वाजले तीन तेरा, यवतमाळ शहराची गिनीज बुकात नोंद करा.”

पार्किंगचे वाजले तीन तेरा, यवतमाळ शहराची गिनीज बुकात नोंद करा.”

95

 डॉ. निरज वाघमारे यांची मागणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड कडे पत्रातून मागणी.

यवतमाळ / प्रतिनिधी
शहराची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि त्या आधारावर वाढत असलेली वाहनांची संख्या पाहता शहरांमध्ये पार्किंग झोनची व्यवस्था करणे, हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र नगरपरिषदेचा ढेपलेला कारभारामुळे पार्किंग सारखा विषय नेहमीच दुर्लक्षित राहते. शहरात पार्किंग झोन ची कुठलीही व्यवस्था नसल्याने यवतमाळ शहराच्या नगरपालिका प्रशासनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करावी अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटनेचे डॉ. निरज वाघमारे यांनी एका पत्राद्वारे केली.
यवतमाळ शहरातील स्थानिक प्रशासन असलेली नगरपालिका आज १२८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. स्वच्छ शहराच्या बाबतीत नावाजलेले यवतमाळ शहर गेल्या काही दिवसात अनेक प्राथमिक असुविधांमुळे चर्चेत आले. रस्ते,पाणीपुरवठा, घनकचरा आणि यातच मुख्य म्हणजे शहरात नसलेली पार्किंगची व्यवस्था. शहरात कुठेही पार्किंग झोन नसल्याने शहरवासीयांना व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासन स्थापनेपासून १२८ वर्षांनंतरही नगरपरिषद शहरवासीयांना हक्काचे पार्किंग झोन देऊ शकत नसल्या कारणाने यवतमाळ शहराच्या नगरपरिषदच्या हलगर्जीपणाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड नोंद घेऊन या मुद्द्याला व्यापक असे रूप द्यावे. अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.निरज वाघमारे यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड कडे केली आहे.

शहराच्या निर्मितीला १२८ वर्ष पूर्ण झाले असून नगरपालिकेचे एक ही अधिकृत पार्किंग झोन शहरात नाही. दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहनधारक गेल्या नंतर नाईलाजास्तव त्यांना आपली वाहने नो पार्किंग व रस्त्याच्या कडेला लावावे लागते. आणि त्यातच नो पार्किंग मध्ये असलेली वाहने वाहतूक पोलीस प्रशासन जप्त करून त्यांना आर्थिक भुर्दंड लावतात. खरंतर यात दोषी नगरपालिका असतांना त्याचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावी लागत आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही आता गिनीज बुक ऑफ वर्डच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून शहराच्या पार्किंग झोनची दखल घेण्यास विनंती केलेली आहे.