Home मराठवाडा माता तू वैरणी ???

माता तू वैरणी ???

527

प्रियकरा साठी त्या आईने केले असे कृत्य की त्याला क्षमा नाही , ??

 

त्या माते सह प्रियकराला अटक ,

अमीन शाह

वाह रे माता एक आई आपल्या मुलांना लहानाचा मोठा करण्यासाठी कबाड कष्ट करते ऊन वारा काहीच पाहत नाही तिच्या आनंदा साठी ती सर्व काही विसरते मात्र आज एका
आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जालना येथे घडली आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मातेसह तिच्या प्रियकरासह एका साथीदाराला अटक केली आहे. शीतल उघडे आणि नवनाथ जगधने असे या दोन आरोपींचे नाव आहे. या दोघांमध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध असून ते जालना मधील अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राहत होते.

प्रेमात अडसर ठरत असल्याने आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली केले. नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने त्या सहा वर्षीय मुलाला अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. 
या प्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्हाच्या आरोपाखाली शीतल उघडे हिच्यासह तिचा प्रियकर नवनाथ जगधने आणि एका साथीदाराला अटक केली आहे. यापूर्वी अशाप्रकराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनैतिक संबंधातून पतीची, पोटच्या मुलांची हत्या करण्याच्या बरीच प्रकरणे उघडकीस आली आहेत.