Home जळगाव ऐनपुर येथील पीरबाबांच्या कामाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते चादर चढवून उदघाटन

ऐनपुर येथील पीरबाबांच्या कामाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते चादर चढवून उदघाटन

534

रावेर( शेख शरीफ)

तालुक्यातील ऐनपुर येथील पीरबाबा शाहअंद वली बाबा यांच्या कामाचे शुरुवात माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते बाबांना चादर-हार चढवून केली गेली,तसेच त्याचे औचित्य साधुन कब्रस्तान मधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, ऐनपुर येथील मुख्य चौकात असलेले पीरबाबा शाहअंदवली बाबा दरगाह च्या कामाची शुरुवात आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी माननीय आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते चादर-पुष्पहार चढवून करण्यात आली,त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवारांचे सत्कार करण्यात आले,

【औचित्य साधुन मुस्लिम पंच कमिटी कब्रस्तान ट्रस्ट ऐनपुर तर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना साकडे】
त्याप्रसंगी औचित्य साधुन
ऐनपुर मुस्लिम कब्रस्तान चे काम काही प्रमाणात अपूर्ण अवस्थेत आहे त्यात कब्रस्तानच्या संरक्षण भींतीचे काम काही प्रमाणात अपूर्ण असून ते मंजूर करुन इतर कामें ही मंजूर होण्याकरिता ऐनपुर मुस्लिम पंच कमिटी कब्रस्तान ट्रस्ट यांनी माननीय आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांच्याकडे निवेदन दिले. त्यात अंदाजे दीडशे मीटर
अपूर्ण असलेली कब्रस्तान संरक्षण भींत ,अंदाजे दीडशे मीटर कब्रस्तान मधील अंतर्गत रस्ता तसेच सभा-मंडपासाठी पत्रांचा शेड मंजूर होऊन काम करून मिळण्यासाठी निवेदन देउत साकडे घालन्यात आले.
तर मुस्लिम कब्रस्तान मधील मागणी केलेले कामे लवकरात लवकर मंजूर करून देण्याचे आश्वासन माननीय आमदार साहेबांनी ऐनपुर मुस्लिम पंच कमिटी कब्रस्तान ट्रस्ट यांना दिली.
त्यावेळी मुत्तलिब सैय्यद अली सय्यद सांडू सहित मुस्लिम पंच कमिटी तसेच सरपंच अमोल महाजन,जगन्नाथ पाटील,अतुल पाटील, छोटुभाऊ पाटील,सुनील महाजन,भैय्या पाटील,जाकिर पिंजारी,आरिफभाई,अख्तर भाई,तसेच सहकारी,रविन्द्रभाऊ,अल्ताफबेग,सुनील खैरे ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.