Home विदर्भ छञपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाकरीता जागा उपलब्ध करण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज...

छञपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाकरीता जागा उपलब्ध करण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज तथा शिवप्रेमीच्या वतीने देवळीच्या मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.!

59
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २३ :- जिल्ह्यातील देवळी शहरात शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी नगरपरिषदच्या वतिने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या दहा पंधरा वर्षापासून असून अजूनही नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने जनतेच्या मागणीनुसार युवा परिवर्तन की आवाज व शहरातील शिव प्रेमी यांनी काही शहरात असलेल्या शिल्लक जागेचा प्रस्ताव नगरपरिषदेला सुचविला आहे.
त्या जागेचा विचार करून नगरपरिषदेचे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शहरातील जनतेला सोबत घेवून जन आदोंलण उभारल्या शिवाय रहाणार नसल्याचे देवळीच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते वेळी युवा परिवर्तन की आवाज शहर अध्यक्ष स्वप्निल कामडी, उपाध्यक्ष एहेतेशाम शेख, प्रविन वांदिले, किरण ठाकरे, नगरसेवक श्याम महाजन, गौतम पोपटकर, माजी शिवसेना तालुका प्रमुख प्रविन काञे, निलेश मोटघरे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting