सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. २३ :- जिल्ह्यातील सावळी खुर्द येथे ग्रामपंचायत च्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा वर्धा सौ. सरीता ताई विजयराव गाखरे, तसेच नवनिर्वाचित कारंजा पंचायत समिती उपसभापती जगदीश भाऊ डोळे यांचा सत्कार करण्यात आला.. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कडून नवनिर्वाचित मान्यवरांचा सत्कार सोबतच गावातील महिलांनकरिता हळदी, कुंकू वानवाटी,उखाणे स्पर्धा, गीत -भजन, संगीत खुर्ची स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात आले या उपक्रमा मुळे गावातील महिलांमध्ये उत्सहाचे वातवरण निर्माण झाले .. सौ. सरीता ताई यांचा सत्कार सौ. उषा ताई सुरेशराव घागरे (सरपंच )आणि उप सभापती जगदीशभाऊ डोळे यांचा सत्कार सुनिलभाऊ पठाडे यांनी केला व मान्यवरांसमोर गावातील समस्यांचे विवेचन आपल्या भाष्यातून महेशभाऊ पेंधे यांनी केले व त्याला दुजोरा देत सौ. सरीता ताई यांनी पुरेपूर प्रयत्न करू असे आश्व्सन दिले तसेच सर्व मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व नागरिक व सर्व महिलांचे आभार ग्रामपंचायत चे सचिव गजेंद्रजी बन्सोड यांनी पार पाडले.