Home परभणी शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज

शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज

411

समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकितील सुर

प्रतिनिधी
कोरोणाचे कारण पुढे करून शाळा बंद आणि दारूची दुकाने सुरू ठेवणे हे खूप मोठे षड्यंत्र आहे. शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते निर्माण होण्याची आणि जोपासण्याची गरज असल्याचा सूर समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत गंगाखेड येथे आळवण्यात आला.

गुरुवारी गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात समविचारी, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बहुजन मुक्ती पार्टी च्या गंगाखेड विधानसभा अध्यक्षपदी विठ्ठल साखरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर ,जोशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भोळे, नारायण घनवटे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मोतीराम सुरनर , विष्णू हिंगे आदींची उपस्थिती होती. कोरोणाच्या काळात दारू दुकान चालू आहे आणि शाळा बंद आहे. मंदिर सुरू व्हावे यासाठी आंदोलने होत असताना शाळा उघडण्यासाठी कोणीच आंदोलन करत नाही ही दुःखाची बाब आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले या शाळेत शिकतात त्या शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जोपासली पाहिजेत असा सूर यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी नारायणराव धनवटे, मस्नेरवडीचे माजी सरपंच जयदेव मिसे, शिवाजी महाराज पडेगावकर,मुंजा लांडे ,नवनाथ लोकरे, गणेश टाक ,विजय खाकरे,कैलास घोगरे , विष्णू हिंगे, दिगंबर हिंगे ,भगवान मात्रे , श्रीकांत शिंदे,नितीन वालेकर ,आनंद व्हावले,साहेब व्हावळे, विशाल व्हावले, दत्तराव करवर, ऋषिकेश माने , कृष्णा गोरे आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण धनवटे तर आभार प्रदर्शन मुंजा लांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे मल्हार मित्र मंडळ, धनगर समाज संघर्ष समिती, धनगर साम्राज्य सेना, जोशी समाज संघटना या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले