Home विदर्भ रस्त्यावर जबरीने लूटमार करणारे आरोपी २४ तासाचे आत अटक , “स्थानिक गुन्हे...

रस्त्यावर जबरीने लूटमार करणारे आरोपी २४ तासाचे आत अटक , “स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कारंजा ची संयुक्त कार्यवाही”

342

इकबाल शेख 

वर्धा –  दिनांक ३१-०८-२०२१ रोजी फिर्यादी कमलेश धनराज कांबळे, वय ३५ वर्ष राहणार कारंजा जिल्हा वर्धा हे स्वतःच्या वाहनाने तळेगाव वरुन कारंजा कडे येत असताना आरोपीतानी संगणमत करून भोयर-पवार मंगल कार्यालयासमोर फिर्यादीस अडवून त्यास चाकू आणि पेचकस चा धाक दाखवून व फिर्यादीस मारहाण करून त्याच्या जवळील असलेले नगदी पैसे अंदाजे 10,000/- रु. व मोबाईल हिसकावून त्यांचे चारचाकी वाहनाने घटनास्थळावरून पळून गेले. फिर्यादी च्या रिपोर्टवरून पोस्टे कारंजा घा येथे अप क्र 247 /2021 कलम 397 भा. द. वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पो.स्टे. कारंजा यांनी संयुक्तरित्या तपास करून आरोपी 1) महेंद्र भाऊराव गायकवाड वय 36 वर्ष रा बेनोडा अमरावती, 2) सुरेश मुरार निकम वय 45 वर्ष रा शिक्षक कॉलनी काली माता मंदिर अमरावती यांना कामठी रोड, पिली नदी नागपूर येथून अत्यंत शीताफितीने ताब्यात घेतले व त्यांचेकडून गुन्ह्यातील 1) गुन्ह्यात वापरेली एक जुनी वापरती मारुती सुझुकी कंपनीची वॅगन आर कार अंदाजे किंमत 1,20,000/- रु. 2) एक जुना वापरता मोबाईल अंदाजे किंमत 10,000/ रू. 3) एक पेचकस अंदाजे किंमत 50.रु. असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. अवघ्या 24 तासाच्या आत नमूद दोन्ही आरोपीस अटक केली व गुन्हा उघडकीस आणला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी श्री सुनील साळुंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक श्री दारासिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्रसिंग यादव, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, अविनाश बनसोड, नितीन मेश्राम, प्रदीप वाघ सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व पोलीस अंमलदार नितेश वैद्य, प्रमोद थूल, विशाल चाफले, सर्व नेमणूक पोलीस स्टेशन कारंजा घाडगे यांनी केली.