Home नांदेड संध्याताई राठोड यांचा वाढदिवस श्री. रेणुकादेवी महाविद्यालयात उत्साहात साजरा.

संध्याताई राठोड यांचा वाढदिवस श्री. रेणुकादेवी महाविद्यालयात उत्साहात साजरा.

122

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर दि.२५ :- आज बळीराम पाटील मिशन, मांडवीच्या सचिव व भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्या आणि महिलांचा खंबीर नेतृत्व असणाऱ्या संध्याताई प्रफुल्ल राठोड यांचा वाढदिवस श्री रेणुकादेवी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून आज 24 ऑगस्ट 2021 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त आज महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जगावर आलेल्या कोव्हीड -19 च्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातून महाविद्यालयात आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मास्क मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे नेते व माहूर – किनवट परिसरातील लोकनेते प्रफुल प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगन मोहन रेड्डी, उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड, एस.एन. राय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अनुराग त्रिपाठी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लोणे, डॉ.धरमसिंग जाधव, डॉ.दत्ता जाधव, डॉ.इकबाल खान, डॉ.संदीप जाधव, प्रा.अवधूत लांडे, प्रा.मोहम्मद नसीरुद्दीन, डॉ.दिनेश विजिगिरी, प्रा. विजय वाढवे, डॉ.अरविंद हरकल, डॉ.पद्मा मदकुंटे, डॉ. महिनाज मुंजेवार, प्रा.दोंदे, प्रा.महेंद्र पट्टेकर, प्रा. माधव जोशी, प्रा.गजानन झुंजारे, डॉ.काशिनाथ राठोड, प्रा. कोलपवार तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.