Home वाशिम अवैध गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक,आरोग्य विभाग व शहर पोलिसांची...

अवैध गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक,आरोग्य विभाग व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

294

वाशिम , (फुलचंद भगत) :- शहरातील रमेश टॉकीज परिसरात अवैध गर्भपात करण्यापूर्वी एका दवाखान्यावर आरोग्य विभागाच्या पथकाने व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत . एस. एम. सारसकर व विलास ठाकरे या बोगस डॉक्टरला ही अटक केली आहे.

वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस. एम सारसकर नामक दवाखान्यावर संध्याकाळी ७:१५ वाजताच्या दरम्यान छापा मारण्यात आला. या दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नबंरवर मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग व पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता,या दवाखान्याची झडती घेतली असता त्यामध्ये गर्भपात करण्याचा औषधीचा साठा आणि अन्य साहित्य मिळून आले. सदर साहित्य जप्त करून आरोपी डॉ.सारसकरसह विलास ठाकरे बोगस डॉक्टरलाही अटक करून वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरुद्ध विविध कलमा अन्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तसेच गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून.सध्या त्या महिलेची प्रकृति बरी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिक्तिसक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.