Home विदर्भ बारडतांडा पारधीबेड्यात पोलीस मातेचा सत्कार

बारडतांडा पारधीबेड्यात पोलीस मातेचा सत्कार

249

देवानंद जाधव

साहित्यीक नामदेव भोसले यांनी जाणल्या समाजाच्या समस्या

यवतमाळ / अकोला बाजार –  पारधी बेड्यातील अशिक्षितपणा व अनेक अडचणींवर मात करीत आपल्या मुलाला उच्च शिक्षण देऊन पोलीस सेवेत दाखल करणा-या पोलीस मातेचा बारडतांडा येथील पारधीबेड्यात सत्कार करण्यात आला.
आदिवासी समाजसेवक , साहित्यिक नामदेव भोसले यांच्या हस्ते पोलीस सिताराम आसम पवार यांची आई नजुती आसम पवार यांचा साडी चोळी व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुणे येथील पारधी समाजातील अदिवासी समाजसेवक नामदेव भोसले हे यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारडतांडा येथील बेड्यातील रस्ता , पाण्याचा प्रश्न, गावठाण जागा , शेतीचे पट्टे , आदी समस्या जाणून घेतल्या. बेड्यातील नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत घरकुलाचा लाभ मिळत नाही ,कोणत्याही शासकीय योजनांची माहिती बेड्यापर्यंत पोहचत नाही , अनेक जण खावटी पासुन वंचित आहे , अदिवासी प्रकल्प विभागाच्या शिलाई मशिन ची योजना माहीत नाही , एकाही लाभार्थ्यांकडून शेळीपालन , कुक्कुटपालन योजनेचा अर्ज दाखल करण्यात आला नाही अशी माहिती येथील नागरिक जगन राठोड, संजय पवार, गोविंद राठोड, तुकाराम राठोड यांनी कथन केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भोसले, श्रीराम निंबाळकर ,
यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे , वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवन राठोड , सरपंच , सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते .