Home महत्वाची बातमी मा , खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक ,

मा , खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक ,

232

 

 

वाशिम येथील प्रकार

 

वाशिम:-भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. सोमय्या वाशिम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी ते येणार होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली असल्याचे समजते.दगडफेकीनंतर किरीट सोमय्या घटनास्थळी न थांबताच निघून गेले आहेत. त्याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने जमावाने मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांना ही गर्दी पांगवण्यासाठी तसेच परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता लाठी चार्ज करावा लागला.

 

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206