Home सांगली क्या एक जन्मदेनेवाली माँ ऐसा कर सकती है ,???

क्या एक जन्मदेनेवाली माँ ऐसा कर सकती है ,???

741

 

 

अमीन शाह ,

विश्वास बसत नाही मात्र ही घटना घडलीय की एक जन्मदात्री आईने आपल्या हाथाने दोन वर्षीय निरागस बलिकेचा गळा आवळून हत्या केली आहे ,
दोन वर्षे होऊनही मुलगी इतर मुलांसारखं बोलत नाही शिवाय ती मतीमंद असल्याच्या संशयानं , सांगलीतील संजयनगर भागातील दडगे प्लॉट मध्ये राहणाऱ्या रेवती संजय लोकरे या महिलेनं , आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय . कुमारी ज्ञानदा संजय लोकरे असं या मयत मुलीचं नांव असून , सदर प्रकारानंतर मुलीच्या आजीनं आणि शेजाऱ्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं . मात्र तपासणी दरम्यान तिच्या गळ्यावर खुणा दिसल्यानं , डॉ.प्रभाकर जाधव यांनी , संजयनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांना पाचारण करुन , झाला प्रकार निदर्शनास आणून दिला.त्यानुसार सदर महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतलं असून , तिच्यावर 147 / 2021 आणि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय .