Home विदर्भ पेढी नदीकाठी गुरे चारतांना एका २२वर्षीय युवकाचा पाय घसरून नदीत बुडून मृत्यू

पेढी नदीकाठी गुरे चारतांना एका २२वर्षीय युवकाचा पाय घसरून नदीत बुडून मृत्यू

417

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमपावती / भातकुली – तालुका अंतर्गत येत असलेल्या सातुर्णा या गावी आज दि. १ आगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास अक्षय पुजांराम माहुलकर वय वर्ष २२ हा पेढी नदीकाठी गुरे चारण्याकरिता गेला असताना त्याचा पाय घसरला तो पेढी नदीच्या वाघडोह मध्ये पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी बडनेरा पोलिस स्टेशनला कळवली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले.अधिक तपास बडनेरा पोलीस करत आहे.