Home विदर्भ ३० जुलै ला घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या कार्यकारणी निवडीच्या सभेचे आयोजन

३० जुलै ला घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या कार्यकारणी निवडीच्या सभेचे आयोजन

153

यवतमाळ / घाटंजी – तालुका पत्रकार संघटनेचा कार्यकाळ ६ जुलै ला संपल्याने विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आणून त्यांचे राजीनामे घेवून ३० जुलै २०२१ ला नविन कार्यकारणी गठीत करण्याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकार बांधवांचे संघटन रहावे, त्यांना निर्भिड पत्रकारिता करता यावी कोणत्याही पत्रकारावर बातमी संकलन करताना अन्याय झाला त्या काळात त्याला सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्यासाठी एक संघटन गरजेचे असते. त्यामाध्यमातून घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे एक वर्षासाठी मुदत ठरवून कार्यकारणी गठीत केल्या जाते. या कार्यकारणीचे अध्यक्ष राजु चव्हाण, उपाध्यक्ष आकाश बूरेवार तर सचिव म्हणून महेंद्र देवतळे हे होते यांचा कार्यकाळ ६ जुलै रोजी संपल्याने ३० जुलै रोज शुक्रवार ला नविन कार्यकारणी गठीत करण्यात येणार आहे. या सभेत विद्यमान अध्यक्ष यांचे सह ईतर महत्वाचे पदाधिकारी यांचा राजीनामा घेवून पद संपुष्टात आणणे, नविन कार्यकारणी गठीत करणे, घाटंजी तालुका पत्रकार संघटना जिल्हा कार्यकारणीला समाविष्ट करायची की, स्वतंत्र संघटना रजिस्ट्रेशन करायची यावर चर्चा, अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय, या कार्यकारणी काळात झालेला व्यवहार आदी विषयावर चर्चा होणार असल्याने ३० जुलै रोजी आयोजित सभेला सर्व पत्रकारांनी हजर रहावे असे घाटंजी पत्रकार संघटनेचे सचिव महेंद्र देवतळे यांनी कळविले आहे.