Home महत्वाची बातमी दस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,

दस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,

388

 

 

मंगरूळपीर तालुक्यातील दस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,पोलिस तपास सुरु

 

फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मंगरुळपीर आसेगाव पो.स्टे.अंतर्गत येत असलेल्या दस्तापुर कासोळा मार्गावर एका अज्ञाताचे प्रेत दिसल्याची माहीती दि.१३ जुलैच्या सकाळी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावुन पंचनामा केला.सदर व्यक्तीचा घातपात आहे का?याविषयी पोलिस शोध घेत असुन वृत्त लिहेपर्यत सदर मृतकाची ओळख पटली नव्हती.
मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दस्तापूर गावा नजीक वाहत्या नाल्यां मध्ये दि १२ जुलै रोजी रात्री १० वाजता च्या सुमारास अज्ञात घटना घडली असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. तसेच अज्ञात व्यक्तीचा मृत्यू देह वाहत्या पाण्यावर कोणत्या अवस्थेत पडल्याचा दिसून आल्याने. दस्तापूर उपसरपंच विश्वनाथ आटपाडकर, मसोला दस्तापूर येथील पोलीस पाटील गिरी यांनी आसेगाव पोलिस स्टेशनला ला कळविल्या मुळे ठाणेदार स्वप्नील तायडे, यांनी पी.एस.आय. खंदारे, बीट जमादार नीलेश अहिर विजय शृंगारे, संदीप मस्के, नागेश राठोड, यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व मृतकांची ओळख पटण्यासाठी परिसरा तील पोलीस पाटील यांना भ्रमण ध्वनि द्वारे विचारपूस करण्यात आली.असून अनोळखी इसमास पोस्टमार्टम साठी वाशीम येथे पाठविण्यात आल्याचे समजले आहे.
अनोळखी मूर्त काची ओळख पटण्यासाठी पीएसआय खंदारे व त्यांचे पोलिस कर्मचारी करत असून पुढील तपास ठाणेदार स्वप्नील तायडे यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे.