Home महत्वाची बातमी काही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;

काही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;

989

मोबाईल नेटवर्कपासून ते वीजेपर्यंत होणार परिणाम

 

सूर्यापासून १६ लाख किलोमीटर वेगाने येणारे वादळ येत्या काही तासांत पृथ्वीवर आदळनार ,

 

अमीन शाह

नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या मते, सूर्याच्या उर्जेपासून तयार झालेलं एक विनाशकारी सौर वादळ (सोलर स्ट्रोम) तब्बल १६ लाख किमी वेगाने आज पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळणार असून त्यामुळे आजूबाजूच्या वीजपुरवठा व अन्य सुविधांवर परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. सूर्याकडून १६ लाख किलोमीटर वेगाने येणारे वादळ येत्या काही तासांत पृथ्वीवर आदळेल. नासाच्या अंदाजानुसार हे वादळ आज रात्री उशिरापर्यंत पृथ्वीवर आदळेल. या वादळामुळे वीजपुरवठा, मोबाईल टॉवर्स ते जीपीएस सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी स्पेसवेदर डॉट कॉमने सांगितले होते की जेव्हा वादळ पृथ्वीवर आदळेल तेव्हा मोठा प्रकाश निर्माण होईल. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या लोकांना रात्री हा मोठा प्रकाश पाहायला मिळणार आहे. ताज्या अंदाजानुसार या सौर वादळामुळे मोठ्या भागामध्ये उच्च-वारंवारता असणाऱ्या रेडिओ सेवेवर एक तासासाठी परिणाम होऊ शकतो.
स्पेसवेदर डॉट कॉमच्या मते, या सौर वादळाबद्दल ३ जुलै रोजी माहिती मिळाली होती. हे वादळ एका सेकंदात ५०० किलोमीटर अंतर पार करत आहे. या वादळामुळे पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर असणाऱ्या उपग्रहांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, हे वादळ जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन सिग्नल आणि उपग्रह टीव्हीवर थेट परिणाम करू शकते. सोलर फ्लेयर्समुळे पॉवर ग्रीडवर देखील परिणाम होऊ शकतो