Home विदर्भ अमित राऊत “यवतमाळ रत्न” पुरस्काराने सन्मानित..

अमित राऊत “यवतमाळ रत्न” पुरस्काराने सन्मानित..

884

यवतमाळ / प्रतिनिधी

जिल्ह्याच्या कालसंपन्न भूमीत विविध कलरत्नांनी कार्यरत्नानी आपली हयात वेचून कलासंस्कृती अजरामर केली आहे. त्यामुळे या कला रत्नांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले.
यवतमाळ शहरातील अनेक कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रात विविध अंगाणी भरीव कामगीरी करून शहराचे नाव लौकिक केले आहे. यातच यवतमाळ शहरातील नेताजी नगर भागात राहणारे अमित राऊत यांनी अभिनय आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्यांना कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सचिव श्रीमती शैला मिर्झापुरे यांनी यवतमाळ रत्न या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. शहरातील आयुर्वेदिक दवाखान्याच्या सभागृहात काल दिनांक ११ जुलै हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अमित राऊत यांना अभिनय आणि नृत्य क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ विधानसभेचे आमदार मदन येरावार तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा उपस्थित होते.
नेताजी नगरातील राऊत हे स्व. रामजी चन्नावार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक असून त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागा तर्फे राज्य नाट्य स्पर्धतील २०१६ सालाचे उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक पुरस्कार प्राप्त असून विविध चित्रपटातून व वेब सिरीजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राऊत यांना देण्यात आलेल्या “यवतमाळ रत्न” पुरस्काराने सर्वच स्तरातून राऊत यांचे कौतुक करण्यात येत असून, रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कार्यक्रम प्रसंगी राजु पडगीलवार, प्रफुल चौहान,प्रा. डॉ. ललिता घोडे, प्रा. डॉ. ताराचंद कंठाले, प्रा. चंद्रशेखर कुडमेथे, विवेक कवटेकर, सुरज गुप्ता,आकाश धुरट, प्रशांत वाघमारे, जयंत चावरे आदी उपस्थित होते…