
इकबाल शेख – वर्धा
तळेगाव (शामजी पंत) : – परिसरातील नजीजच्या खरासी शेत शिवारातील शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ माजली. सविस्तर वृत्त असे निखील बबनराव सोनेकर म.पो. परसोडा ता. आष्टी, हल्ली मुक्काम तळेगाव यांनी बिज्जु मोहता यांचे खरासी शिवारातील ६ एकर शेत वाहि पेरीसाठी मक्त्याने घेतले असुन आज सकाळी ८ वाजताचे दरम्यान तुर कपासी बियाण्याची डोबणी करण्यास महिला मजुरांना शेतात घेवुन गेले होते तेव्हा शेतात असलेल्या विहिवर पिण्याकरिता पाणी आणण्यास गेले असता विहिरीत पाण्यावर मृतदेह तरंगतानी आढळून आला. तेव्हा निखिल सोनेकर यांनी शेजारच्या शेतात असलेल्या कालुसिंग बावरी याला आवाज देवुन बोलाविले व त्यांनी लगेच याची माहिती तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली. पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन लोकांच्या मदतीने मृतदेह विहरी बाहेर काढुन पाहणी केली असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असुन मृतकाचे अंगात फक्त काळ्या रंगाचा नाईट पॅंट आहे तर उजव्या हातावर विजय हे नाव व बदाम असलेले चिन्ह गोंदलेले आढळुन आले मृतकाचे वय अंदाजे ४० वर्ष असावे सदर मृत इसमा बाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन तळेगाव येथे येऊन माहिती द्यावी अशा सूचना तळेगाव पोलिसांनी केलेली आहे. सदरचा तपास ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात जमादार सुधीर डांगे, पो.शि. विजय उईके, अमोल इंगोले हे करीत आहे.










































