Home विदर्भ अनेक दिवसानंतर गोळीबाराने यवतमाळ शहर हादरलं….तरुणाचा मृत्यु

अनेक दिवसानंतर गोळीबाराने यवतमाळ शहर हादरलं….तरुणाचा मृत्यु

3723
0

यवतमाळ – स्टेट बँक चौक , यवतमाळ येथे अनोळखी इसमानी केलेल्या गोळीबाळात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली. करण परोपटे (रा. चांदोरे नगर) असे मृताचे नाव असुन वाळू घाटाच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर व यवतमाळ शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.सदर या घटनेने यवतमाळ शहरात एकच खळबळ उडाली असुन आरोपी कोण हे नेमके कोण हे कळू शकले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या टिप्स हि दिल्या..!

Unlimited Reseller Hosting