Home महत्वाची बातमी बिबट वाघिणीने दिला तीन पिलांना जन्म.

बिबट वाघिणीने दिला तीन पिलांना जन्म.

120
0

ईकबाल शेख.

वर्धा – वर्धा जिल्हा कारंजा घाडगे तालुक्यातील शेलगाव उमाटे गावाजवळील जंगल भागामध्ये बिबट नावाच्या वाघिणीने तीन सावधान ना जन्म दिला आहे त्यामुळे परिसरामध्ये वाघांच्या पिला ना बघणार्‍यांची संख्या वाढत आहे ही घटना आज 22 जून ला गावकऱ्यांच्या लक्षात आली आहे

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता आज दिनांक 22 जून ला आठ वाजता चे दरम्यान शेलगाव उमाटे येथील मनोर डोंगरे नावाचा युवक आपले शेतात बंदर आले म्हणून हाकलण्यासाठी गेला असता गुहेच्या बाहेर आलेले वाघाची पिले बघून बंदर झाडावर जोरजोराने इकडून तिकडे उड्या मारत होते व ओरड त किंचाळत होते त्यामुळे मनोहरला बंदर का ओरडतात म्हणून शंका आल्याने त्याने तिथे बघून पाहिले तर एका मोठ्या दगडाच्या खाली असलेल्या गुहेमध्ये बिबट नावाच्या वाघिणीने तीन पिलांना जन्म दिल्याचे त्याच्या लक्षात आले व ही पिल्ले आठ ते दहा दिवसाच्या आधी जन्माला आली असावीत असा अंदाज त्यांनी वर्तविला व गावांमध्ये येऊन लगेच गावातील लोकांना ही माहिती दिली वन विभागाला याबाबत सूचना देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाची टीम घटनास्थळावर दाखल झाली असून सध्या घटनास्थळाकडे जाण्याचा मार्ग वनविभागाने बंद केलेला आहे परंतु वन विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचण्यापूर्वीच अनेक शेलगाव येथील नागरिकांनी व हौशी तरुणांनी या पिल्लांची फोटो काढले असून पिलांची आई मात्र सध्या त्या ठिकाणी आढळून आलेली नाही
याबाबत शेलगाव उमाटे येथील काही लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की ही पिल्ले तीन नसून दोनच आहेत जवळ जवळ एकमेकांच्या आधाराने ती लहान पिल्ले बसत असल्याने ती जास्त दिसत असावेत असे सांगितले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र याबाबत अजून कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही

Unlimited Reseller Hosting