Home मुंबई विमल व मुर्जी ची मस्ती उतरवून अटक करवण्यासाठी डेमोक्रॅटिक रिपाइंचे पावसाळी अधिवेषणावर...

विमल व मुर्जी ची मस्ती उतरवून अटक करवण्यासाठी डेमोक्रॅटिक रिपाइंचे पावसाळी अधिवेषणावर दे धडक बे धडक धरणे आंदोलन.

69
0

(आता नाही तर कधीच नाही.: डॉ. राजन माकणीकर)

मुंबई दि (प्रतिनिधी) महाठग विमल शहा ची मस्ती व महादलाल मुर्जी पटेल च्या दादागिरीला लगाम घालून यांना अटक करवून प्रकल्पापासून वंचित पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पावसाळी अधिवेषणावर “दे-धडक बे-धडक” धरणे आंदोलनात करणार असल्याची माहिती डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आकृती / हब टावून विकासक महाचोर विमल शहा व याचा मास्टरमाइंड महादलाल मुर्जी पटेल यांनी एमआयडीसी च्या तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अंदाजे १० हजार रुपये करोडोंचा महाघोटाला केला आहे. याचे सबलपुरावे व वंचितांच्या तक्रारी आमच्याकडे उपलब्ध असल्याचे डॉ माकणीकर यांनी सांगितले.

प्रकल्पाला चालू होऊन वीस वर्षे झाली, मात्र: आजही शेकडो मूळ झोपडी धारकांना सदनिका व भाडे धनादेशापासून वंचित ठेवले आहे. आकृती हब टाऊन विकासकाने ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प राबवले आहेत त्या-त्या ठिकाणी असा भ्रष्ट व महाघोटाळा केला आहे.

उद्योग सारथी च्या माध्यमातून एमआयडीसी परिसर तर बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शंकरवाडी, शिवाजी नगर, हरी नगर, तेली गल्ली, साई वाडी, परिसरात ही असाच घोटाळा केला आहे. वडाळा येथेही याचे काम याच पद्धतीने चाललेले आहे.

एमआयडीसी, बृहन्मुंबई महापालिका तत्कालीन व विद्यमान अधिकारी, आकृती / हब टाऊन विमल, मुरजी यांचा दलाल केवल वालांभिया याच्या पासून त्रस्त आहेत, भाडे धनादेश व सदनिकेपासून वंचित असतील अश्यांनी पीडितांनी *”दे-धडक बे-धडक”* धरणे आंदोलनात सामील होण्याचे आवाहन डॉ. माकणीकर यांनी केले आहे.

डॉ राजन माकणीकर आयोजित आंदोलनाचे नेतृत्व पक्षप्रमुख कनिष्क कांबळे करतील तर कॅप्टन श्रावण गायकवाड, हरिभाऊ कांबळे, भाई विजय चव्हाण, राजेश पिल्ले, उमरखान पठाण आंदोलनाची व्यवस्थापकीय बाजू सांभाळतील.

Unlimited Reseller Hosting