Home विदर्भ आर्वीत बाळा जगताप यांच्या नेतृत्वात रिक्षा चालक धडकले नगर पालिकेवर

आर्वीत बाळा जगताप यांच्या नेतृत्वात रिक्षा चालक धडकले नगर पालिकेवर

411

(शासनाचे घोषित अनुदान न मिळाल्याने प्रहार ची धडक)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे राज्यात जे दुसऱ्या टप्प्याचे १५ दिवसांकरीता लॉक डाऊन राज्यात लागू केले होते. तेव्हा एक सानुग्रह मदत म्हणून रिक्षा चालकांना (कटला चालक) प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे वचन दिले होते. ते अजूनपर्यंत कुणालाही मिळालेले नाही आहे. १५ दिवसांचा लॉक डाऊन मात्र ४५ दिवसांचा झाला. या काळात सर्वाधिक हाल अपेष्टा या रिक्षाचालकांच्या झाल्या मात्र त्यांना कोठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. या सर्व रिक्षा चालकांची नोंद ही ग्रामपंचायत, नगर पालिका, यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर घेऊन ती मदत वाटण्यात येणार होती. मात्र असे अजून कोणतेही नियोजन प्रशासनामार्फत दिसत नसल्याने आज प्रहारचे नेते बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी शहरातील रिक्षा व्यावसायिकांनी नगर पालिकेवर रिक्षा मोर्चा काढत मदतीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे हे अधोरेखित केले. त्या अनुषंगाने लवकरात लवकर या सामान्य कष्टकऱ्यांना आपण घोषित केल्याप्रमाणे सानुग्रह मदत द्यावी.. व नगर पालिका प्रशासनाने सुद्धा याची दखल घेऊन या मदतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे.. असे बाळा जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगर पालिका मुख्याधिकारी विनायक मगर यांनी आपण काही रिक्षा चालकांचे नवे शासनाला पाठवले आहे. जे राहिले असतील त्या सर्वांचे नावे शासनाला पाठवून सर्वांना मदत मिळवून देऊ असे मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले
यावेळी जुम्मा शहा, माणिक बायबोले, सीताराम उपराटे, पुरुषोत्तम खोकले, इम्रान शाह, शंकर मडामे, शेख महफुज, कैलास मडामे, शेख सलीम, शेख इलियास, शेख हमीद, अशोक लोखंडे, हिम्मत, शेख फिरोज, सुधाकर, इत्यादी रिक्षा चालक तथा
अरसलान खान, सुधीर जाचक, विक्रम भगत यांच्यासह प्रहारचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.