Home मराठवाडा छप्पन बत्तीस या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना संधी मिळेल तहसीलदार नरेंद्र...

छप्पन बत्तीस या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना संधी मिळेल तहसीलदार नरेंद्र देशमुख

514

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मे.पुष्पदत्त फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत भाऊ गीते निर्माते एक नवीन चित्रपट छप्पन्न बत्तीस ह्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त समारंभ येथील तहसील परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला आहे

यावेळी मा.नगराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार देशमुख,माजी कृषी
सभापती,लातूरचे बजरंग जाधव, उदघाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख, दिलीप महाराज झेंडे , निर्माते भाऊ गीते, युवा पत्रकार गोपाल चव्हाण, देवराज कोळे हे उपस्थित होते. समाजवादी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शेख अहम्मद शेख मोहम्मद शेख,
पी.आय.ठाकरे, पोलीस निरीक्षक परतूर उद्योजक सुरेश रहिंज,दादासाहेब जगताप दिग्दर्शक/निर्माता अ.नगर
अल्काताई बाळू शेजवळ माजी नगराध्यक्षा शिर्डी ह्या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती, या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजीनाथ पोपळघट यांनी केले तर आभार कलाकार नम्रता पाटील यांनी मानले कार्यक्रमच सुत्रसंचलन युवा पत्रकार गोपाल चव्हाण यांनी केले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुष्पदत्त फिल्मस् प्रोडक्शन दिग्दर्शक भाऊ गीते,अभिनेता समीर मुल्ला रावसाहेब गीते,अभिनेते अक्षय अनारसे, विनोद गीते, गणेश कापडी, महेंद्र आव्हाड सागर गीते,अक्षय गीते आसिफ शेख , सुर्यकांत जाधव , संतोष गीते, प्रसाद आव्हाड, संकेत कापडी,संदीप शेलार, , नम्रता पाटील , पुजा सोनु, आनिता काटे यांनी अथक परिश्रम घेतले, अक्षय अनारसे, अभिनेता यांनी परिश्रम घेतले.