Home मराठवाडा जाफराबाद पत्रकार हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

जाफराबाद पत्रकार हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

756

राजू इंगळे.

आरोपी चा तपास घेता घेता पोलिसांच्या नाकात आला दम


उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन जाफराबाद येथील वाळू माफियांच्या बातम्या प्रकाशित केल्याने पत्रकारावर जीवघेणे हल्ला. हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पोलिसाच्या संगनमताने आरोपी फरार झालेले असून आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी न्यायालयाचे पत्र घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी.

 राहुल मोहन जाधव , गणेश गजानन जाधव  ,विषाल मोहन जाधव , भगवंत तान्हाजी जाधव ,  धनराज दौलत जाधव तान्हाजी पांडुरंग जाधव , व इतर यांच्याविरुद्ध
भा द वि 307,324,143,147,148,149,327,506,135, व कलम 4 पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे 

जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार यांच्यावर दिनांक ११ शुक्रवार रोजी पंचायत समिती जाफराबाद कार्यालयासमोर वाळू माफियांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जिवघेणे हल्ला केला. तसेच वाळूच्या बातम्या का छापतो म्हणून ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर जणांना देखील मारहाण झाली यात ते गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर उपराचासाठी आधी जालना नंतर औरंगाबाद येथे नेण्यात आले आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या वाळू माफियांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन भोकरदन तालुका पत्रकार संरक्षण समिती ची उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना देण्यात आले आहे. यावेळी झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला.
‌निवेदनात म्हंटले आहे गेल्या वर्षभरापासून वाळू माफियांनी दहशत निर्माण केली असून यामध्ये महसूल व पोलीस प्रशासन सहभागी आहे. समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळू उत्खनन बाबत आपल्या दैनिकात बातम्या प्रकाशित केल्यामुळे याचा इतर पत्रकारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस घटनेत वाढ होत असून वाळू चोरीचा सर्रास प्रकार सुरू आहे. अशा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे व देवळेगव्हाण येथील दैनिक लोकमतचे पत्रकार चंद्रकांत पंडित रा. देवळेगव्हाण यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करित पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर चौकशी करून गुन्हा दाखल करून कडक कारेवाही करण्यात यावी अशी मागणी भोकरदन तालुका पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर पत्रकार संरक्षण समिती चे सर्व पदाधिकाच्या स्वाक्षऱ्या आहेत , पत्रकार संरक्षण समितीचे जालना जिल्हा सचिव प्रकाश सुरडकर , शिवाजी विनायक पडवळ संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष भोकरदन , यस रावळकर तालुका उपाध्यक्ष भोकरदन ,  राजू इंगळे भोकरदन शहराध्यक्ष जफर पठाण सर्व उपस्थित होतेे.