Home महत्वाची बातमी पती ला पत्नीने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून विपरितच घडले , ?

पती ला पत्नीने वांग्याची भाजी दिली नाही म्हणून विपरितच घडले , ?

1162

 

 

पतीला अटक

अमीन शाह

 

नवरा – बायकोमध्ये कधी आणि कोणत्या कारणावरून वाद होईल याचा काही नेम नाही.अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील हेर येथे घडली आहे . एका युवकाने वांग्याच्या भाजीसाठी आपल्या पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिलं आहे . या दुर्दैवी घटनेत आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे . पीडितेच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं आहे . पीडित महिलेलला लातूरमधील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे . शारदुल शेख असं आरोपी पतीचं नाव आहे . तर गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित पत्नीचं नाव फरजाना शेख आहे . पत्नी फरजाणा हिने काल सकाळी घरी वांग्याची भाजी केली होती . यावेळी आरोपी पती शादुल आणि फर्जाना यांच्यात किरकोळ वाद झाला . या वादामुळे शादुल घरी जेवण न करताच निघून गेला . पण रात्री शारदुल दारू पिऊन घरी आला . मद्यधुंद असणाऱ्या शारदुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली . फर्जाना यांनी वांग्याची भाजी संपल्याचं पतीला सांगितलं . पण शारदुलने वांग्याची भाजीच पाहिजे असा हट्ट धरला . पत्नीनं वांग्याची भाजी संपल्याच सांगितल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं . या दुर्दैवी घटनेत पत्नी फर्जाना शेख गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत . अवघ्या हजार – दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या हेर गावात या घटनेनं खळबळ उडाली आहे अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांना गावकऱ्यांनी लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं . फर्जाना यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे . याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शादूल शेखला अटक केली आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत .

Previous articleआजोबा आणि मुलाने बापास मारून टाकले…!
Next articleSushant Singh Rajput case filed before NHRC
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.