Home नांदेड नांदेड येथील श्री.गूरुगोंविदसिंघजी शासकीय रुग्णालयामधील कोविड रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेल्यातीन महिन्यांपासून...

नांदेड येथील श्री.गूरुगोंविदसिंघजी शासकीय रुग्णालयामधील कोविड रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेल्यातीन महिन्यांपासून पगार अडवले व कामावरुन ही कमी करण्यात आले – DYFI अध्यक्ष नांदेड,कॉ.अंकुश माचेवाड

291
0

प्रतिनिधी – राजेश भांगे

नांदेड –  नांदेड येथील श्री गुरुगोंविदसिंघजी शासकीय रुग्णालयातील कोविड मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यापासुन पगार दिला नाही, व त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.

याविषयी सर्व कर्मचाऱ्यांनी दि.७ जून ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलन केले व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली असता त्यांनी येत्या ४ दिवसात याविषयी न्याय देऊ असे सांगितले होते परंतु ५ दिवस उलटूनही याविषयी काहीच तोडगा काढला नाही की, माहीती दिली नाही, म्हणून सर्व कर्मचारी थेट उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, सर्वं कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत व त्यांना परत कामांवर घेत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाहीत, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

तरी यामध्ये वार्ड बाॅय, एएनएम, जीएनएम, लॅब टेक्निशियन,व इतर सर्वं कर्मचारी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असुन,
याविषयी लवकरात लवकर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

व तसेच या निवेदनावर UNAअध्यक्ष नांदेड आदी बनसोडे व DYFI अध्यक्ष नांदेड कॉ.अंकुश बनसोडे यांच्या सह्या आहेत.

Previous articleवर्धा स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी व दुचाकी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद
Next articleराज्य सैनिक फेडरेशनच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी दिपक राजेशिर्के 
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.