Home विदर्भ वर्धा स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी व दुचाकी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी व दुचाकी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

235
0

रविन्द्र साखरे

वर्धा शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु असतांना एक इसम रेल्वे स्टेशन वर्धा येथे संशयास्पद स्थितीत मिळून आला. सदर संशयीत इसमास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सतीश उर्फ शेम्बड्या बाबाराव मडावी, वय 23 वर्ष रा. दादाबादशा नगर, राळेगाव जिल्हा यवतमाळ असे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वर्धा जिल्यातील पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील १) अप.क्र. ५४१/२०२१ कलम ४५७, ३८० भादंवि, २) अप.क्र. ५०९/२०२१ कलम ४५७, ३८० भादंवि, ३) अप.क्र. ५१४/२०२१ कलम ३७९ भादंवि, ४) पो.स्टे. रामनगर अप.क्र. ३००/२०२१ कलम ४५७, ३८० भादंवि असे एकूण ४ गुन्हे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन बाभूळगाव येथील अप.क्र. २२८/२०२१ कलम ४६१, ३८० भादंवि असा एक गुन्हा अशा एकूण ५ गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचेकडून १) भारतीय चलनाच्या ५००/- रू चे ४२ नोटा, २) भारतीय चलनाच्या १०० रू.चे ११० नोटा ३) एक नविन निळ्या रंगाचा रेडमी कंपनिचा अॅन्ड्राईड मोबाईल, ४) एक लोखंडी रॉड असा एकूण किंमत ४२,०२०/- रु. चा नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली व पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, यशवंत गोल्हर, पवण पन्नासे, राजेंद्र जयसिंगपुरे, अभिजित वाघमारे, मनिष कांबळे, गोपाल बावनकर, नवनाथ मुंडे , दिनेश बोथकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

Previous articleपेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या तुलनेत कृषी खर्चातील वाढ कमी नाहीच – शैलेश अग्रवाल
Next articleनांदेड येथील श्री.गूरुगोंविदसिंघजी शासकीय रुग्णालयामधील कोविड रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेल्यातीन महिन्यांपासून पगार अडवले व कामावरुन ही कमी करण्यात आले – DYFI अध्यक्ष नांदेड,कॉ.अंकुश माचेवाड
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.