Home जळगाव लोहारा सुकीनदीच्या घाटात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले. घाटाच्या दुर्दशेला बेजबाबदार...

लोहारा सुकीनदीच्या घाटात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले. घाटाच्या दुर्दशेला बेजबाबदार अधिकारी ,लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमुळे लागले डांबरीकरणाचे ग्रहण..

578
0

जळगाव – हमीद तडवी

रावेर तालुक्यातील लोहारा हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव म्हणून परिचित आहे,या गावाजवळ महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाचे सुकी धरण सातपुड्याच्या कुशीत असल्याने हे लोहारा गाव महाराष्ट्राच्या नकाशात प्रसिद्ध स्थळ म्हणुन परिचित आहे.तर या सातपुडा जंगलातील सुकी धरण हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहुन पर्यटक हे लोहारा गावाहुनच प्रवास करीत असतात,नेहमी वाहनांची वर्दळ व येजा सुरु असते त्यामुळे येथील सुकी नदीच्या घाटात वाहनांची नेहमी वर्दळ असते,त्याचबरोबर लोहारा शेतीशिवारात केळी ,हळद ,कापुस हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांची वर्दळ,मजुर कामगारांची वर्दळ,शेतकऱ्यांच्या बैलगाड्या अशा अनेक चारचाकी,दुचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांची देखील वर्दळ असते या खड्ड्यामय रस्त्यामुळे व सुकी नदीच्या घाटाच्या खड्ड्यांमुळे अनेकांची डोके फुटली आहेत,या घाटात अनेकांचे अपघात होऊन अनेकजण जख्मी झाले आहेत अशा ह्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे अशा ह्या वारंवार घटनांचा संपुर्ण प्रकार बांधकाम विभागाच्या अधिकारी व आमदार खासदार,संबधित मंञी यांना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक दुर्लक्ष व यांच्यामधे तेरी भी चुप और मेरी भी चुप असल्याकारणाने लोहारा घाटात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहेत,मागील सहा महिन्यांच्या कालावधीत देखील ह्याच सुकीनदीच्या घाटात कुंभारखेडा येथील मजुर महिलांचे ट्रक्टर सुद्धा पलटी झाले होते,माञ सुदैवाने जीवीतहानी टळली होती ,तरी जेणे करुन अपघात होऊन जीवीत हानी होणार नाही. याकडे संबधितांनी जातीने व गांभीर्याने लक्ष देऊन कुंभकर्णाची झोप दुर करुन तात्काळ सुकी नदीच्या घाटाचे नव्याने डांबरीकरण करावे व सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांचे होणारे अपघात थांबवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी परिरातील जनतेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.तसेच ह्या सुकी नदीच्या घाटाचे डांबरीकरण न केल्यास रास्ता रोको आंदोलन व येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा लोहारा ,कुसूंबा,कुंभारखेडा चिनावल सह आजुबाजुच्या गावकऱ्यांनी ,शेतकऱ्यांनी,मजुरांनी व महिलांनी या प्रसिद्धी पञकाद्वारे संबधित शासन प्रशासनाला दिला आहे.संबधितांनो जागे व्हा, जागे व्हा..अन्यथा आंदोलन नक्की धेडणार…

Previous articleकोरोनायोध्दा ललित जैन यांचा प्रदेशाध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले यांच्यातर्फे सत्कार..!
Next articleरयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.