Home विदर्भ कोरोनायोध्दा ललित जैन यांचा प्रदेशाध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले यांच्यातर्फे सत्कार..!

कोरोनायोध्दा ललित जैन यांचा प्रदेशाध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले यांच्यातर्फे सत्कार..!

479
0

यवतमाळ – महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे कोरोना रूणांच्या मदतीकरिता आयोजित “कोविड-१९ कंट्रोल रूम” यात यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी यु.काँ.जिल्हा सरचिटणीस ललित जैन यांना देण्यात आली होती.ललित यांनी आपले कर्तव्य उत्कृष्ठपणे सांभाळत कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध देणे,रेमडेसिवीर व टॅाकीझुमाब यासारख्या औषधांचा अन्न व औषध पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करून देणे,अपंग रूग्णांना लसीकरणासाठी मदत करणे याप्रकारे समाजकार्याची जबाबदारी पार पाडली.विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ.नाना पटोले यवतमाळ येथे माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी आले असता ललित जैन यांचा कोरोनाकाळात केलेल्या कार्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आ. कुणाल पाटील, अतुल लोंढे, नाना गावंडे, आमदार वजाहत मिर्झा,राहूल ठाकरे, प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, अरुण राऊत, बाळासाहेब मांगुळकर,देवानंद पवार,अनिल गायकवाड,अतुल राऊत उपस्थित होते.

Previous articleकोरोनाच्या नावाखाली माझ्या वडिलांचा घातपात होण्याची शक्यता  -सुरेश वाघमारे यांची ” खाते निहाय CBI मार्फत चौकशी ची मागणी “
Next articleलोहारा सुकीनदीच्या घाटात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले. घाटाच्या दुर्दशेला बेजबाबदार अधिकारी ,लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमुळे लागले डांबरीकरणाचे ग्रहण..
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.