Home नांदेड ईस्लापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार 12 हजार लाचेची रक्कम घेवून पळून गेला.

ईस्लापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार 12 हजार लाचेची रक्कम घेवून पळून गेला.

803
0

मजहर शेख, प्रतिनिधी : नांदेड

नांदेड/किनवट, दि : ८:- नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे ईस्लापूर येथे 12 हजार रुपयांची लाच स्विकारून एक पोलीस अंमलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सुगावा लागताच लाच घेवून पळून गेला आहे.
ईस्लापूर भागातील एका 48 वर्षीय व्यक्तीला बिअर बारची परवानगी हवी होती. त्यासाठी त्याने केलेल्या अर्जाची तपासणी करण्यासाठी ती संचिका ईस्लापूर पोलीस ठाण्यात आली होती. याबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी पोलीस अंमलदार रामेश्र्वर आनंदराव आलेवाड (34) पोलीस नाईक बकल नंबर 2043 याने 12 हजार रुपयांची लाच मागितली अशी तक्रार त्या बार परवानगी मागणाऱ्याने 30 मे 2021 रोजी नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लाच मागणीची पडताळणी पंचासमक्ष 1 जून 2021 रोजी झाली. त्यानुसार आज दि.8 जून रोजी लाच स्विकारण्याचा दिवस ठरला. त्यानुसार लाच देणारा व्यक्ती आणि सरकारी पंच तेथे पोहचले. रामेश्र्वर आलेवाडने पंचासमक्ष लाचेचा स्विकार केला. त्यानंतर त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा असल्याचा वास आला. तेंव्हा रामेश्र्वर आलेवाड लाचेची 12 हजार रुपये रक्कम घेवून पळून गेला आहे. त्यानुसार ईस्लापूर पोलीस ठाण्यात रामेश्र्वर आलेवाड विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, पोलीस अंमलदार बालाजी तेलंगे, गणेश केतकर, सचिन गायकवाड, गणेश तालकोकुलवार, शेख मुजीब यांनी पार पाडली.
रामेश्र्वर आलेवाड यांच्या लाच सापळ्याची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असतील तसेच त्याच्या लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवकांचे एस.एम.एस., व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास आणि माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून माहिती द्यावी तसेच टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02462253212 आणि पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा भ्रष्टाचाराची माहिती देता येईल. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा जनतेला भ्रष्टाचाराची माहिती देता येईल.

Previous articleआमदार चंद्रकांत नवघरे (भैया) याच्या हस्ते कोविड लसीकरण उदघा
Next articleसंप्रदायाचे पांघरून अंगावर घेणाऱ्यांना कोण शिक्षा करणार ?
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.